c Rajivsmruti

१) मुकबधिर निवासी शाळा, कुर्डूवाडी

शाळेचे नाव मुकबधिर निवासी शाळा, कुर्डूवाडी
आमच्या विषयी या शाळेत ग्रामीण भागामधील म्हणजेच माढा,मोहोळ, पंढरपूर, परांडा पासून मुले शाळेत आहेत. मुले ग्रामीण भागामधील आसून त्यांचे पालक मुलांना सांभाळण्यास असमर्थ असलेल्या मुलांना या शाळेत सामावून घेतले आहे. या शाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी वेळोवेळी करणेत येते तसेच मुले कुपोषीत राहू नयेत म्हणून खाद्य सामग्रीमध्ये चवदार पौष्टिक आहार दिला जातो. जेणेकरून मुलांचे आरोग्य योग्य राहिल असे भोजन दिले जाते. रोटरी क्लब, लायन क्लब, अशा सामाजिक संस्थाकडून शाळेस भेटी दिल्या व शाळेचे कौतुक केले. या शाळेतील मुलांची संख्या वाढ पाहता शाळेसाठी ४ एकर जागा घेतली आहे. अद्यावत इमारत बांधणेचे काम सुरू केले. या शाळेत विविध क्रीडा साहित्य व खेळाचे मैदान करणेत आले आहे.
शाळेचा फोटो